महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शीतल जल प्याऊ’ सुरू
का टा वृत्तसेवा/ चंद्रकांत श्रीखंडे कळमेश्वर : महालक्ष्मी डेव्हलपर्सचे संचालक नितीन गेडाम यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘शीतल जल प्याऊ’ सुरू करण्यात आली आहे. या शीतल पाणपोईचे उद्घाटन सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डाॅॅ. राजीव पोतदार, मनोहरराव गेडाम, प्रकाश वरूळकर, कृष्णाजी बगडे, प्रमोद हत्ती, प्रकाश पांडे, सुभाष मानकर, संकेत कोहाड, मनोज बगडे, सविता नाथे, रंजना देशमुख, मनीषा कुहिटे, ॲड. जयश्री पवार, कृष्णाजी बगडे इ. मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
कळमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असून येथे लगतच्या सर्वच गावांमधून मोठया प्रमाणावर शेतकरी, विद्यार्थी, महिला, पूरूष विवीध कामाने येत असतात. जेमतेम उन्हाळा सुरू झाला आहे. एकीकडे उन्हाने तर पाण्यासाठी तहानेने व्याकूळ पादचाऱ्यांसाठी ही पाणपोई म्हणजे वरदानच् ठरते. महत्वाचे म्हणजे नितीन गेडाम स्वखर्चाने ही सेवा उन्हाळाभर पुरवित असतात, हे विशेष. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.