कामगार टाइम्स

PLATATION : ११,१११ झाडांचा वृक्षारोपण सोहळा

का टा वृत्तसेवा कळमेश्वर :  तालुका वकील संघ, तालुका विधी सेवा समिती व वनविभाग यांचे संयुक्त विद्यमाने 11111 वृक्षांचे भव्य वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज सकाळी तेलकामठी येथे ९.३० ते ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. दिनेश पी. सुराणा असून मुख्य अतिथी मा. प्रविन एम. उन्हाळे, न्यायाधिश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा समिती, नागपूर हे आहेत.                         विशेष अतिथींमध्ये मा. संजीव सरदार न्यायाधीश दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर, सावनेर, नितिनजी तेलगोटे जिल्हा सरकारी अभियोक्ता नागपूर, सरिता ताराम, सहाय्यक संचालक तथा सरकारी अभियोक्ता, नागपूर हे उपस्थित राहतील.          

राष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

लक्षवेधी


क्रीडा

गुन्हेवार्ता