काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नीतेश राणे यांच्यावर अत्यंत तिखट टीका

एक साडेचार फुटी मंत्री म्हणतो- धर्म विचारून सामान घ्या : विजय वडेट्टीवार

मुंबई : देशात व राज्यात सध्या जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या टाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना धर्म विचारून दुकानातून सामान विकत घेण्याचे सांगत आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
                         राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी नुकतेच दापोली येथील सभेत हिंदू धर्मियांना दुकानदारांकडून धर्म विचारून खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला होता. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा. विशेषतः त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
                          सद्यस्थितीत देशात व राज्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये दोन जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या केल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारचा साडेचार फुटाचा एक मंत्री जनतेला जात विचारून दुकानातून सामान घेण्याचे सांगत आहे, असे ते म्हणाले.

बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत, “आम्हीही ‘चुनचुनके’ मारू” : वडेट्टीवार

                        विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत. पण आमचे दिवस आले तर ‘आम्हीही चुनचुनके मारू’. एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय परिस्थिती आहे. त्यांचा केवळ वापर केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे पहावे लागेल. सरकारने सीबीआय व ईडीला बाजूला करावे. त्यानंतर काय होते ते पहावे.

                         या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. यांना 10 दिवस लोटले तरी पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीत. ते कधी ते सापडणार? हे या सरकारने सांगावे. अतिरेक्यांचे कपडे भेटले, लोकेशन भेटले, मग अतिरेकी का सापडत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News