काटोल नगर परिषदेद्वारा आयोजीत योग शिबीराची सांगता

महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून  शिबिराचा समारोप

का टा वृत्तसेवा 

काटोल : महिलांच्या सुदृढ आरोग्याची संकल्पना घेत नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या पुढाकाराने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव पटांगणात आयोजित योग शिबिर पंधरवड्याची नुकतीच सांगता झाली. गुरुवारी सकाळी योग तर सायंकाळी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून या शिबिराचा समारोप झाला.

                        कार्यक्रमाला आ. चरणसिंग ठाकूर, नागपूर विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके यांची उपस्थिती होती. यावेळी माजी नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, लक्ष्मी जोशी, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, मोवाडचे मुख्याधिकारी अमोल परिहार, योग प्रशिक्षक हंसराज मिश्रा, अशोक कडू, डाॅ. तेजसिंह जगदळे आदी उपस्थित होते.
                       १ मेपासून सुरू झालेल्या या योग व झुंबा शिबिरात शहरासह आजूबाजूच्या गावांतील महिलांनी हिरिरीने सहभाग घेतला. समारोपीय सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. १५ दिवसीय शिबिरात प्रशिक्षण देणारे योग प्रशिक्षक हंसराज मिश्रा, डाॅ. तेजसिंग जगदाळे, अशोक कडू, झुंबा डान्स प्रशिक्षक पूजा ओके, पूजा बरसे, डिंपल ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

योग शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित आ. चरणसिंग ठाकूर, विभागीय सहआयुक्त संघमित्रा ढोके, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर व इतर मान्यवर.

                        शिबिराच्या आयोजनासाठी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, उपमुख्याधिकारी उमेश हैंबाडे, उपमुख्याधिकारी खुशाल कळंबे, कर अधीक्षक सचिन जायभाये, लेखापाल पंकज खवसे, योग प्रशिक्षक सचिन वाळके, नामदेव बारई, चार्वी भावे, मुकेश ठाकरे, रमेश इंगळे, गौरव लोंढे, कैलास खंते, अविनाश बरसे तसेच पालिका कर्मचार्यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक कैलास खंते यांनी केले. संचालन रमेश कोळी यांनी केले. तर आभार चार्वी भावे हिने मानले.

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News