कु. रेखा प्रफुल ठाकरे हिला जेईई मध्ये 93.14 टक्के

कु. रेखा प्रफुल ठाकरे आयआयटी प्रवेशासाठी होणा-या ॲडव्हांस परिक्षेसाठी पात्र 

का टा वृत्तसेवा
वर्धा : आर्वीच्या माॅडेल हायस्कूलची विद्यार्थीनी कु. रेखा प्रफुल ठाकरे हिला जेईई-मेन 2025 परिक्षेत 93.14 टक्के मिळवून ती आयआयटी प्रवेशासाठी होणा-या ॲडव्हांस परिक्षेसाठी पात्र झाली आहे.
                        कु. रेखा प्रफुल ठाकरे ही भाईपूर (वाठोडा), तालुका आर्वी जि. वर्धा भाईपूर (वाठोडा) येथील रहीवाशी असुन तिचे वडील प्रफुल बाबाराव ठाकरे हे शेतकरी आहेत. तीचे 1 ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण कृषक मराठी शाळा, आर्वी येथे तर ५ थी ते १० वी पर्यंतचे शिक्षण गांधी विद्यालय आर्वी येथे झाले आहें. तीेने माॅडेल हायस्कूल आर्वी येथून 12 वीची परिक्षा दिलेली आहे.
                        कु. रेखा हि अभ्यासू असून तीने कोणत्याही प्रकारे टिवशन्स लावलेल्या नव्हत्या. तिने ऑनलाईन क्लासेस जाॅईन करूनच घरी मोबाईलवरून अभ्यास करूनच् ऑल इंडिया रॅंकची परीक्षा 93.14 टक्के गुण मिळवून पास केली आहे. तीच्या या अभूतपूर्व यशाबद्यल तीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News