♦तब्बल 22 सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
नागपूर : गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका, असे लोक आपल्या पक्षात नकोत, अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. संघटनेत जास्त काम करेल त्याला आपण संधी देऊ, असेही बावनकुळे म्हणाले. ते आज नागपुरात पक्ष प्रवेशावेळी बोलत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नागपूर जिल्ह्याच्या रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस आणि काँग्रेस समर्थीत पक्षातील तब्बल 22 सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला जिल्ह्यातील सर्व आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसेच अवैध धंदे करणारे लोक पक्षात घेऊ नका. तसेच तुमच्या गावात नव्या सदस्य नोंदणीचे प्रयत्न सुरू करा, अशा सूचना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या.
अवैध धंदे करणारे लोकं पक्षात घेऊ नका : चंद्रशेखर बावनकुळे
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढायची असेल तर किमान 1000 सदस्य करावे लागेल. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे, अवैध धंदे करणारे लोकं पक्षात घेऊ नका. असे लोकं आपल्या पक्षात नको. संघटनेत जास्त काम करेल त्याला आपण संधी देऊ. असेही बावनकुळे म्हणाले.
राज्यात 1 कोटी 46 लाख सदस्य झाले आहे. 1 कोटी 51 लाखाचा आपले लक्ष्य : चंद्रशेखर बावनकुळे?
विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र च्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी हे सरपंच आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहे. देशात 13 कोटी तर राज्यात 1 कोटी 46 लाख सदस्य झाले आहे. 1 कोटी 51 लाखाचा आपले लक्ष्य आहे. त्यामुळे उद्यापासून तुमच्या गावात नव्या सदस्य नोंदणीचे प्रयत्न सुरू करा, अशा सूचना बावनकुळे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या. 50 सदस्य केल्याशिवाय तुम्हाला सक्रिय सदस्य म्हणून नोंदवता येत नाही आणि त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या समित्यांवर किंवा पक्षामधील पदाधिकारी म्हणून घेता येत नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.