♦ श्री गुरूदेव मानव मंदिर, कर्मश्री दुर्गादासजी रक्षक स्मृति शांतीवन, येरला येथे संपन्न होणार
♦ सर्वांगिण सुसंस्कार निवासी शिबिर २० एप्रिल २०२५ ते २७ एप्रिल २०२५ पर्यंत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता तत्व प्रणालीनुसार जीवन शिक्षणाचे धडे आजच्या नवयुवकांना देऊन देश धर्म संस्कृतीला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक अशी तरूण पिढी घडावी या उद्देशाने नियमबद्ध दिनचर्या ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण संवर्धन होण्यासाठी ‘सर्वांगिण सुसंस्कार निवासी शिबिर’ २० एप्रिल २०२५ ते २७ एप्रिल २०२५ पर्यंत श्री गुरूदेव मानव मंदिर, कर्मश्री दुर्गादासजी रक्षक स्मृति शांतीवन, येरला येथे संपन्न होणार आहे. इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांना या शिबिरात पाठविण्याचे आवाहन शिबीराचे मुख्य आयोजक ज्ञानेश्वर रक्षक यांनी केले आहे.
सर्वांगिण सुसंस्कार शिबिरातील विषय
बौद्धिक :- सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, थोर पुरूषांचे चरित्रदर्शन, सेवावृत्ती, आदर्श दिनचर्या, वक्तशीरपणा, आज्ञापालन, उठण्या बसण्याची व बोलण्याची शिस्त, निर्भयता, व्यसन निर्मूलन, स्वदेशी वस्तुंबद्दल प्रेम, स्वावलंबन, व्यक्तिमत्व विकास, अंगभूत कलेचे दर्शन, त्यासाठी सामुदायिकपणे सफाई, पाणी व्यवस्था, भोजन वाढणे, सामुदायिक ध्यान प्रार्थना व गावकरी संचालन करणे, सामाजिक कर्तव्याची जाणीव, आदर्श ग्रामगीता, देशापुढील भीषण प्रश्न तसेच प्राथमिक आयुर्वेद निसर्गोपचार व औषधोपचार.
व्यायाम :- सूर्य नमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठी काठी, लेझिम, मल्लखांब, पिरॅमिडस् (मनोरे) व विविध मनोरंजक मैदानी खेळ इत्यादी.
भजन व संगीत :- मराठी हिंदी भजने, मंगलाष्टके व स्वागतगीते तसेच ताल, स्वर, शब्दोच्चार, हावभाव, साथसंगत, हार्मोनियम (पेटी), तबला, टाळ, खंजरी आदींचे प्राथमिक शिक्षण.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुख्य आयोजक श्री. ज्ञानेश्वर रक्षक, मो.नं. 9823966282