“ग्रामगीतामय विद्यार्थी घडविणे हेच रामकृष्णदादांचे कार्य !”आमदार राजेश वानखडे
का टा वृत्तसेवा I संदिप माळोदे
अमरावती : आद्यग्रामगीताचार्य पूज्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर हे संपूर्ण आयुष्य ग्रामगीतामय जीवन जगले. नवीन पिढी व विद्यार्थ्यामध्ये ग्रामगीतेची आवड निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन तिवसा मतदार संघाचे आमदार राजेश वानखडे यांनी केले. श्रीकृष्ण जन्माष्टमी-पूज्य दादांच्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र वरखेड (अमरावती) येथे दि. 15 व 16 ऑगस्टला आयोजीत दोन दिवसीय कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक व राष्ट्रसंताच्या साहित्याचे अभ्यासक रामदास चोरडे गुरुजी, प्रा. राजेंद्र ठाकरे, श्रीगुरुदेव प्रचारक मुकुंद पुनसे, ह .भ .प. गजानन महाराज सुरकार, सरपंच राहुल तायडे, कार्यक्रमाध्यक्ष राष्ट्रीय नकलाकार हरिभाऊ बेलूरकर हे होते.

स्वातंत्र्यदिनी व श्रीकृष्ण जन्माष्टमीला ग्रामगीता पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. ग्रामगीता पाठांतर स्पर्धेचे परीक्षण गजानन महाराज सुरकार, ग्रामगीता प्रचारक माणिकदादा बेलूरकर, ग्रामगीता बंजारा अनुवादक विठ्ठल रणबावळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दिलीप मोहेकर यांनी तर आभारप्रदर्शन सुरेन्द्र बेलूरकर यांनी केले.
ग्रामगीता स्पर्धेकरीता परिसरातील 50 च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये हरिभक्त परायण गजानन महाराज सुरकार यांच्या शुभहस्ते कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विनोद आगासकांडे, भारती अनिल बेलूरकर, वंदना हरणे, सुधाकर वाघाडे, अरुण बावणे, अजय मेश्राम, अशोक अलोने, विश्वनाथ अंधारे, संजय भोजने, सुभाष धुर्वे, भारती पाचघरे, अरूणा भोयर, संजय गणोरकर, बारबुध्देदादा यांनी प्रयत्न केले. राष्टूवंदनेव्दारे कार्यक्रमाची सांगता झाली.