समाज कंटक सणोत्सवाला मिरवणुकीत गालबोट लावणार नाही याची दक्षता उत्सव समितीने घेतली पाहिजे : विश्व पानसरे
साखरखेर्डा : महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे डिजेवर खर्च करण्यात येणारा पैसा हा ग्रंथालय उभारणीसाठी खर्च केला तर अनेक पिढ्या घडतील मात्र कायद्याचे उल्लंघन करून सणोत्सवाला काही समाज कंटक गालबोट लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात अशा वेळी मिरवणुकीत अशा कुप्रवृत्तीला उत्सव समितीने रोखले पाहिजे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले.
दि ४ एप्रिल रोजी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत पोलिस अधीक्षक पानसरे यावेळी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार गजानन करेवाड आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक पानसरे बोलताना म्हणाले की, सध्या पुस्तक वाचण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रत्येक गावात ग्रंथालय स्थापन करण्यासाठी खर्च करा. इतरत्र होणार खर्चही टाळावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात ठाणेदार गजानन करेवाड यांनी येणाऱ्या रामनवमी, भीमजयंती साठी नागरीकांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष दसरे यांनी केले.