डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार

गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

डोंबिवली : डोंबिवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. यानंतर पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. येथे या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.
                        हा संपूर्ण प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने उघडकीस आल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत या पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी महिलेसह तिचा पती व दोन पुरुष अशा चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुस्कान शेख या महिलेच्या विरोधात यापूर्वी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
                        पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली येथे राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आशुतोष राजपूत या तरुणाचे घरी येणे जाणे होते. तो मसाले विक्री करायचा. घरी येणे जाणे सुरू झाले व यात या तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. दहावीची परीक्षा झाल्यानंतर आई व तिच्यात काही कारणांवरून भांडण झाले होते. आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून मुलीने आशुतोषचे घर गाठले. आई व मुलीच्या भांडणाचा फायदा घेत आशुतोषने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
                        मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी आशुतोष हा तिच्या घरी आईला भेटत होता व सांगत होता की मुलीला या ठिकाणी पाहिले तसेच मुलगी शहरातच आहे, असे सांगत होता. यावर आईने देखील विश्वास ठेवला. राग शांत झाल्यावर येईल घरी असे म्हणत दोन महीने उलटले पण मुलगी काही परतली नाही म्हणून आईला संशय आला व तिने टिळक नगर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली.
                         पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरू केले. यावेळी मुलगी डोंबिवली जवळ एका ग्रामीण भागात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला व मुलीची सुटका केली. पीडित मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व मुस्कान शेख व तिच्या नवऱ्यासह आणखी दोघांना अटक केली.

आशुतोष राजपूत अद्यापही फरार

                         आशुतोष राजपूत याने मुलीचे अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. तर या प्रकरणात आशुतोष राजपूत हा अद्याप फरार. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News