धापेवाडयाच्या श्री कोलबास्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
का टा वृत्तसेवा : संजय श्रीखंडे
धापेवाडा : एसएससी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, श्री कोल्बास्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धापेवाडा येथील निकाल शंभर टक्के लागला आहे. कु. धानी दीपक ठाकरे हिने 94.60 % गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला असुन कु. अनुष्का ज्ञानेश्वर धोटे हिने 94 % गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. रितिक हरी पांधूरनेकर हा 92.80 % गुण घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे,
संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री सुनील केदार तसेच संस्थेच्या सचिव सुहासताई केदार यांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय उईके शाळेच्या पर्यवेक्षिका शामली चांनिकर, शाळेचे शिक्षक पाथरकर, कडू, बागडे, कोडे, राऊत, नंदनवार, भड यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले आहे.