संगीत शिक्षक कपील ढोरे यांचे ‘संगीत’ विषयाबाबत विद्यार्थ्यांसोबत हितगुज
काटा न्यूज नेटवर्क भिवापूर/मालेवाडा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नक्षी येथे गायन व संगीत या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. संगीत शिक्षक कपील ढोरे यांनी संगीत या विषयाबाबत विद्यार्थ्यांसोबत हितगुज साधले. या चर्चासत्रात संगीत शिक्षक कपील ढोरे यांनी संगीताविषयी मुलांमध्ये बालवयातच आवड कशी निर्माण झाली पाहिजे,अध्ययन – अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांनी अगदी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनी पण आपल्या भाषेत संगीताविषयी उत्तरे दिली. यावेळी मुख्याध्यापिका नंदा गिरडकर, शिक्षिका सुरेखा ईखार, शिक्षक मनोज मुंडले, शिक्षक बाबासाहेब पाटील व शाळेतील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (संगीत शिक्षक कपील ढोरे हे ‘अंध’ असून ‘संगीताचे’ गाढे अभ्यासक आहेत.)