विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशा करिता लागणाऱ्या बाबींचे मार्गदर्शन

नगर परिषद विद्यालयाचा एसएससीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

का टा वृत्तसेवा : मनिष निंबाळकर
कळमेश्वर: शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये उत्तीर्ण होणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नगरपरिषद माध्यमिक विद्यालयाचे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभ प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आवर्जुन उपस्थित होते. या प्रसंगी गुणानुक्रमे उत्तीर्ण मयुरी परांडे, अथर्व डेहनकर, शर्वरी झुंजारकर, पूर्वा वावरकर, खुशी गमे, भावेश कुंभारे, सुमित वर्मा, सिमरन रघुसे, जानवी तरवटकर, वंशिका बोराटे, दक्षता लोणकर या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला.

                        या सत्कार प्रसंगी नगरपरिषद कळमेश्वर च्या प्रशासन अधिकारी टालाटुले, शाळा व्यवस्थापन समितीचे सतीश सौदागर, बबनराव वानखेडे,  घुमडे इत्यादी सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापिका मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगीे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशा करिता लागणार्या बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. ही प्रक्रिया आॅनलाईन कशा पद्धतीने होणार आहे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

                       याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक  जांभरुणकर, पर्यवेक्षक राठोड, ज्येष्ठ शिक्षक डाॅ. मनीष निंबाळकर, आलोने, सोनकुसळे, बावनथडे इत्यादी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदे यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News