August 15, 2025 4:35 am

नागपूर शिक्षण उपसंचालकांसह पाच जणांना अटक; शासनाला कोट्यवधींचा फसवणूक

नागपूर शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस,

बनावट शालार्थ आयडी घोटाळा उघड

नागपूर : नागपूर शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीत घेऊन शासनाची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.
                       या प्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली. त्याचबरोबर वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सुरज नाईक या तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
                        २०१९ पासून नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बोगस प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. सुमारे ५८० बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आली. शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला.
                       उल्हास नरड यांच्यावर कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदाची मंजुरी देण्याचा आरोप आहे. सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ४७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. या घोटाळ्यात अनेक वरिष्ठ अधिकारी गुंतले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News