April 12, 2025 10:13 am

बुद्धगया महाबोधी महाविहारासाठी कळमेश्वरात २० रोजी मोर्चा

बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे -बौद्ध भिक्खुसंघाची मागणी

का टा वृत्तसेवा

कळमेश्वर : बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी बौद्ध भिक्खुसंघाने केंद्र सरकारसह बिहार सरकारकडे केली आहे. या मागणीसाठी बौद्ध संघाच्या वतीने गुरुवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता कळमेश्वर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे.

                   बुद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खुसंघाच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी जगभरातील बौद्ध अनुयायांनी बुद्धगया येथे सध्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे.                            मोर्चादरम्यान भदंत शील रक्षित महाथेरो, भदंत आनंद बोधी थेरो, भदंत सारीपुत्त थेरो, भदंत मोदगलायन थेरो यांची उपस्थिती राहणार असून, तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन अरुण सहारे,अरुण वहाने, इंद्रकुमार तागडे, वर्षा बन्सोड, हरिदास इंगळे, गौतम जांभुळकर, प्रभू कराडे, ज्योत्स्ना मंडपे, राहुल गोंडाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News