भंडाऱ्यात ट्रक-बोलेरोचा भीषण अपघात:चार जण जागीच ठार; एक गंभीर

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना

भंडारा/ नागपूर : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान भंडारा महामार्गावरील बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर रविवारी रात्री ही घटना रविवार रात्री 10 वाजून 30 ते 11 च्या सुमारास घडली. अपघातानंतर महामारगावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रूग्णालयात दाखल केले, तर मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

                        मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. अशोक फुलचंद डेहरवाल, शैलेंद्र लेखाराम बघेले, शैलेश पन्नालाल गोकुळपुरे, मुकेश बिंजेवार या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अविनाश नाकतोडे जखमी आहे.

                     घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलिस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News