सावनेर: भाजपचे नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ. राजीव पोतदार यांना पक्षाने विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी यासांठी सावनेर विधानसभा मतदार संघातून पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नुकतेच मुंबई येथे गेले होते. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांची भेट घेतली. गेल्या ३० वर्षापासून संपूर्ण नागपूर जिल्हा भाजपामध्ये समर्पित भावनेने यशस्वीरीत्या व आपल्या संघटन कौशल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार करुन पक्षाला अभूतपूर्व यश संपादन करून दिले आहे. आमदार डाॅ. आशीष देशमुख याच्या प्रचंड विजयाने पोतदार यांच्या परिश्रमाची पावती पक्षासमोर आहे. त्यांची प्रचंड मेहनत आणि समर्पित भावना लक्षात घेता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची जोरदार मागणी सावनेर मतदारसंघ व नागपूर जिल्हयाच्या वतीने केली.
विधानपरिषद आमदार म्हणून डाॅ. राजीव पोतदार यांची विधानपरिषदेची उमेदवारी निश्चिती संदर्भात निवेदन देण्यात आल, त्यावेळी सावनेर विधानसभेचे विद्यमान आमदार डाॅ. अशिष देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यावेळी डाॅ. पोतदार यांना विधानपरिषदेत नक्कीच संधी देऊ असा शब्द शिष्टमंडळाला दिला आहे.
या प्रसंगी इमेश्वर यावलकर, मनोहर कुंभारे, विजय देशमुख, रामराव मोवाडे, संदीप उपाध्याय, मंदार मंगळे, धनराज देवके, प्रमोद हत्ती, राजू घुगल, साजिद पठाण, पियुष बुरडे, पंकज भोंगाडे, दिलीप डाखोळे, अभिषेक धोटे, पिंटू सातपुते इ. उपस्थित होते.