भाजपचे माजी खासदार रामदास तडस मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला : देवळीत संताप

जानवे, सोवळे न घातल्याने मंदिर ट्रस्टी मुकुंद चौरीकरचा, रामदास तडस यांना पूजेला मज्जाव

का टा वृत्तसेवा

देवळी (वर्धा) : माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या अर्धागिनी तथा माजी नगराध्यक्षा शोभा तडस यांना येथील राम मंदिरात रविवारी जानवं, सोवळं घातलं नसल्याचे कारण देत पूजाअर्चा करण्यास मज्जाव करण्यात आला. मंदिराच्या गाभाऱ्यात राम दर्शनाची मनाई करण्यात आली. यामुळे रामनवमीच्या पवित्र पर्वावर भाविकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
                         रविवारी सर्वत्र रामनवमीची धूम होती. माजी खासदार तडस सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास पत्नीसह येथील राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. मात्र, मंदिर ट्रस्टी प्रा. मुकुंद चौरीकर यांनी तुम्ही जानवे व सोवळे घातले नाही, गाभाऱ्यात येऊन दर्शन घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांना मनाई केली. रामनवमीच्या मुहूर्तावर हा प्रकार घडल्याने सर्वजण थक्क झाले.

आमदार राजेश बकाने यांनी ठणकावले, विचारला जाब

                        माजी खासदार रामदास तडस यांना पूजा करण्यास मज्जाव केल्याची माहिती मिळताच दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास आमदार राजेश बकाने यांनी राम मंदिर गाठून वादग्रस्त ट्रस्टी प्रा. चौरीकर यांना फैलावर घेतले. ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य यांची झाडाझडती घेतली. देवस्थानचे वाटोळे सहन करणार नाही, अशी तंबी दिली. हा प्रकार राम जन्मोत्सव झाल्यानंतर घडला. यावेळी ट्रस्टीने एका भाविकांवर पट्टा उगारला. त्यामुळे हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते.

 

                       श्रीराम नवमीनिमित्त राम मंदिरात सपत्नीक गेलो होतो. तेथे पूजा, दर्शन करण्यास मनाई करण्यात आली. सोबतच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विचारणा केली असता केवळ सोवळे घातलेल्या व्यक्तीलाच गाभाऱ्यात प्रवेश असल्याचे सांगण्यात आले. गणपत महाराजांच्या समाधी मुखवट्याला हारार्पण करू देण्याची विनंती केली असता तीसुद्धा नाकारली. पुजारी कुटुंब पिढीजात आहे. पण सध्या पुणे येथे स्थायिक असून केवळ रामनवमीस येतात. जुने मंदिर असल्याने आमची आस्था आहे. हे ओवळेसोवळे काय लावले. तुम्ही एक दिवसासाठी येता आणि नियम सांगता हे बरे नव्हे. पुजारी अडून बसल्याने मी वाद टाळला. या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण होते.
रामदास तडस, माजी खासदार

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News