अपघातातील जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारणाऱ्या,
स्थानिक तरुणाचा गॅस गळतीमुळे गुदमरल्याने मृत्यू
मध्य प्रदेशातील मंदसौरमधून चकारिया गावात एक भीषण अपघात झाला आहे. दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी आहे.
अपघातग्रस्त इको व्हॅन गॅसवर चालत होती, त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू झाली, असे सांगितले जात आहे. यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या. गॅसमुळे गुदमरुन गाडीतील पुरुष आणि महिला वेदनेने तडफडू लागल्या. घटनास्थळी गोंधळ उडाला. यादरम्यान, एका स्थानिक तरुणाने कारमधील जखमींना वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली, परंतु गॅस गळतीमुळे गुदमरल्याने त्याचाही मृत्यू झाला.