महात्मा जोतिराव फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सामाजिक समता सप्ताह साजरा
नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महात्मा जोतिराव फुले जयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दर वर्षी सामाजिक समता सप्ताह साजरा करीत असते. या दोन्ही महापुरुषाचे सामाजिक समते करिता मोठे योगदान आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर जिल्हा, सुजाता महिला मंडळ, नवनीत नगर युवा मंच यांचे वतीने नवनीत नगर वाडी नागपूर येथे ‘सामाजिक समता सप्ताहाचे निमित्ताने’ महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका राज्य विभागीय सदस्य विजया श्रीखंडे यांनी वाचन करून व चळवळीचे गीते निकी बोंदाडे, इंजी. गौतम पाटिल, विभा कावरे, चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. फुले सावित्री नसती तर या गाण्यावर विलोभनीय नृत्य मंगला गाणार आणि माही मोहिले यांनी सादर केले. चमत्कार सादरीकरण राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे, इंजी. गौतम पाटील यांनी केले.
एकपात्री नाटक मी सावित्री बोलतो शोभा पाटील यांनी सादर केले. “बाबाचा चमत्कार महिलेवर बलात्कार” हे नाटक रॉकी घुटके, आशुतोष टेंभुर्णे, अजय रहाटे, इंजी. कमलाकर सतदेवे, वर्षा सहारे, प्रिया गजभिये, इंदू उमरे, चंदा मोटघरे यांनी सादर केले. “जोतिराव का संघर्ष” हे सुप्रसिद्ध नाटक जे महात्मा जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजाच्या प्रगती करिता काय त्याग आणि संघर्ष केला याची आठवण करून देते. हे नाटक गौतम माघडे, वर्षा सहारे, अजय रहाटे, चंदा मोटघरे, आशुतोष टेंभुर्णे, चंद्रशेखर मेश्राम, इंजी. कमलाकर सतदेवे यांनी सादर केले गेले, संचालन रामभाऊ डोंगरे तर आभार प्रदर्शन विनीत गजभिये नवनीत नगर युवा मंच यांनि केले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.