कळमेश्वर तालुक्यात एचएससी कला शाखेतून
मोहपा न्यू इंग्लिश हायस्कूलची कु. अनुजा रमेश टेकाडे प्रथम
का टा वृत्तसेवा : भूषण सवाईकर
मोहपा : कळमेश्वर तालुक्यात एचएससी कला शाखेतून सर्वाधीक 84.83ः घेवून कु. अनुजा रमेश टेकाडे प्रथम, 83.00ः मार्क घेऊन कुमारी धनश्री युवराज खरबडे द्वितीय तर कुमारी डाॅली संजय सावरकर हिने 82.67ः घेऊन तृतीय येण्याचा मान पटकावला आहे. मोहपा न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे एकूण 326 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेची एकूण टक्केवारी 99.69 इतकी ठरली.
एचएससी विज्ञान शाखेतून कुमारी विजया नंदकिशोर केवटे हिने सर्वाधीक 82.83ः अंक घेवून शाळेतून प्रथम, कुमार दिपांशु संजय अखंड याने व कुमारी पूर्वा मनोज बेदरकर हिने 79.33ः अंक प्राप्त करत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर कुमार शांतनू सुंदरलाल सिरपात्रे हा 75.67ः मार्क घेऊन तिसऱ्या क्रंमांकावर आहे.

एचएससी वणिज्य शाखेतून कुमार रोहित मेघशाम दानव याने 83.50ः मार्क घेऊन प्रथम, कुमार समीर शंकर पाटील याने 78.17ः मार्क घेऊन द्वितीय तर कुमारी पायल अजय बेले हिने 72.07ः मार्क घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.

धनश्री खरबडे हिला एचएससी राज्यशास्त्र या विषयांत सर्वाधीक 99 टक्के गुण मिळवून ती नागपूर विभागातून राज्यशास्त्र विषयांमध्ये प्रथम आलेली आहे. तिला डाॅ. निवेदिता मानमोडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कुंदाताई विजयकर तसेच सचिव अरविंद धवड, मुख्याध्यापक शमशुद्दीन शेख, पर्यवेक्षक विजय चिमोटे, भूपेश मारोडे, विवेक देशमुख, राजेश झाडे, डाॅ.निवेदिता राऊत, सुरेखा भोये, विलास आसवले, रोशन जुनघरे, विनोद पोतदार तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.