का टा वृत्तसेवा : संजय गणोरकर
कळमेश्वर : मोहपा एज्युकेशन सोसायटी मोहपा या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सुद्धा आपली शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवत इयत्ता दहावीच्या निकालात अव्वल ठरली आहे.
छायाचित्र:भुषण सवाईकर
शाळेचा एकूण निकाल 94.08 टक्के लागला. शाळेतून रोहन बबन पाटील 95.80 टक्के गुण मिळवून प्रथम, कु श्रावणी श्रीकांत डांगोरे 94.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तसेच कु नैना अनिल चामट 92.40 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. शाळेत एकूण 186 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते, त्यामधून 46 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त तर 52 विद्यार्थी प्रथम व 53 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
छायाचित्र:भुषण सवाईकर
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कुंदाताई विजयकर, सचिव अरविंदजी धवड, मुख्याध्यापक शमशुद्दीन शेख, पर्यवेक्षक विजय चिमोटे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी व शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
छायाचित्र:भुषण सवाईकर
आदर्श विद्यालय मांडवी चा निकाल 100 %
मांडवी : आदर्श विद्यालय मांडवी ची विद्याथ्र्यीनी कुमारी कृतिका दिलीप ठोंबरे 87.80ः गुण घेऊन
प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. 78ःगुण घेउन कुमारी हर्षा बालाजी डोळसे ही द्वितीय तर 76.80ः गुण घेऊन कुमारी नीता तुकाराम दूधकवरे हिने तृतीय येण्याचा मान पटकावला आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेला एकूण 26 विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व 26 ही विद्यार्थी पास झाले. विद्यार्थी व शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.