रघवी समाजाचे देवस्थान, गुजरखेडी साठी ५ कोटी रुपयांची तरतूद
आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे रघवी समाजातर्फे आभार
सावनेर नागपूर — गुजरखेडी येथील रघवी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मौनी बाबा तपोभूमी देवस्थानाला प्रादेशिक पर्यटन विभागामार्फत ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी रघवी समाजातर्फे आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
मौनी बाबा तपोभूमी हे रघवी समाजासाठी एक महत्त्वाचे धार्मिक व सांस्कृतिक केंद्र आहे. नारळी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आणि होळी पौर्णिमा यासारख्या पवित्र दिवशी येथे समाजबांधव मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. या वेळी सामूहिक लग्ने, भजन, प्रवचन, एकत्रिक चौका आरती अशा विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भंडाऱ्याचेही आयोजन होते.
या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीनंतर, समस्त रघवी समाज, मौनी बाबा तपोभूमी देवस्थान कमिटी व कबीर पंथी बांधवांनी आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांची भेट घेऊन आभार प्रदर्शन केले.
या वेळी उपस्थित होते: 🔹 परमपूज्य पंच श्री हुजूर प्रकाश मुनी नाम साहेब 🔹 नवोदित वंशाचार्य परमपूज्य उदित मुनी नाम साहेब 🔹 माजी पंचायत समिती सदस्य व वाघोडा जिल्हा परिषद सर्कल प्रमुख श्री तिलकजी कमाले 🔹 मंडळ महासचिव पिंटेस महंत 🔹 गुजरखेडी कमिटीचे अध्यक्ष श्री बाबुरावजी लोलूसरे, उपाध्यक्ष विनोदजी महाजन 🔹 माजी सचिव रमेश दाजी महंत, सहसचिव कुसुमदासजी महंत, अरविंदजी केसरे, दिलीपजी केसरे, माणिक देवजी धामदे आणि समस्त कबीर पंथी समाज.
या निधीमुळे मौनी बाबा तपोभूमीचे सौंदर्यीकरण व सुविधा विकास साधला जाईल, तसेच समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना आणखी बळ मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.