August 15, 2025 11:38 am

Revenue Week has commenced : राज्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ..

कळमेश्वर तालुक्यात महसूल सप्ताहाचा शुभारंभ 

का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
कळमेश्वर :राज्य शासनाचा महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखल्या जातो. प्रशासनाने लोकाभिमुख आणि पारदर्शक पद्धतीने कामे करावीत व गतीमान पद्धतीने विविध कामे वेळेत मार्गी लावण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसुल सप्ताह साजरा करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाल्याने व त्या अनुषंगाने खालीलप्रमाने सप्ताहात कामे होणार असल्याचे तहसिल कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

                    यात पहिल्या दिवशी दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ ला ‘महसुल दिन साजरा करून व महसुल सप्ताहाचा ‘शुभारंभ’ करण्यात आला. महसुल संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संवाद, उत्कृष्ट अधिकारी/ कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
                         दिनांक ०२ ऑगस्टला – शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटूंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटूंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                       दिनांक ०३ ऑगस्टला पाणंद/  शिवरस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.
                       दिनांक ०४ ऑगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात येणार आहे.
                      दिनांक ०५ ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे.
                      दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ ला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे. (नियमानुकूल करणे/ सरकारजमा करणे)
                       शेवटी दिनांक ०७ ऑगस्टला M-Sand धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे (SOP प्रमाणे) धोरण पूर्णत्वास नेण्याचे उद्धीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार शासनाच्या विवीध महसुली योजनांचा लाभ नागरिकांना या महसुल सप्ताह मध्ये घेता येणार आहे. तरी कळमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महसूल सप्ताहात शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन कळमेश्वरचे तहसिलदार विकास बिक्कड यांनी केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनी नागरिकांची कामे  कायदेशीर मार्गाने, जबाबदारी पूर्वक वेळेत पुर्ण करून, नागरिकांचा वेळ व खर्च वाचविण्याचे निर्देश  तहसिलदार बिक्कड यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News