आत्मरक्षेसाठी हनुमानाचा आदर्श समोर ठेउन अन्यायाचा प्रतिकार करा : यशवंत सिंह ठाकुर
नागपुर: सर्व नागरिकांनी आत्मरक्षेसाठी हनुमानाचा आदर्श समोर ठेउन अन्यायाचा प्रतिकार केला पाहीजे व दिनदुबळ्यांच्या उत्थानासाठी अविरत प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन बजरंग बल चे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत सिंह ठाकुर यांनी केले आहे. ‘बजरंगबली जन्मोत्सव’ निमित्ताने आयोजित महाप्रसाद व फळ वितरण प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेउन राष्ट्रविरोधी, संविधानविरोधी, धर्माधर्मात तेढ व जातीय सलोखा बिघडवणार्यांवर अंकुश लावण्यासाठी वेळप्रसंगी निकराची लढाई लढण्यासाठी सिद्ध राहण्याचे आवाहन यशवंत सिंह ठाकुर यांनी केले. ‘बजरंग बल’ या सर्वसामांन्यांच्या संघटनेस युवकांसोबतच समाजातील प्रत्येक घटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हे संगठन प्रत्येकाच्या पाठीशी सदैव राहील याची ग्वाही दिली. ‘राष्ट्रीय बजरंग बल’ तर्फे यशवंत सिंह ठाकुर यांनी कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी आयोजकांचे आभार मानले.
हनुमान जन्मोत्सवाच्या सशस्वी आयोजनासाठी आमदार विकास ठाकरे, युवा सनातन संघटन प्रकाश कायदवार, श्रीकांत दुर्गे, बब्बू ठाकूर, रविंद्र ठाकूर, सचिन शर्मा, राष्ट्रीय बजरंग बल नारी शक्तीच्या भारती ठाकुर, वंदना वंजारे, संजीवनी उरकुंडे इ. यांनी अथक परिश्रम घेतले.