विशाखापट्टणम : आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सला २१० धावांचे लक्ष्य दिले आहे. विशाखापट्टणममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊने २० षटकांत ८ गडी गमावून २०९ धावा केल्या.
मिचेल मार्शने ३६ चेंडूत ७२ धावा आणि निकोलस पूरनने ३० चेंडूत ७५ धावा केल्या. दोघांमध्ये ८७ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. डेव्हिड मिलरने नाबाद २७ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून मिचेल स्टार्कने ३ विकेट घेतल्या. कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या.