लातूर मनपा आयुक्तांचा डोक्यातगोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

रात्री 11.35 वाजेची घटना, प्रकृती चिंताजनक

लातूर : लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या शासकीय बंगल्यावर घडली. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण कळू शकले नाही.
                        बाबासाहेब मनोहरे हे जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शासकीय वसाहतीमधील बंगल्यात वास्तव्यास आहेत. नेहमीप्रमाणे रात्री घरी जेवण झाल्यावर त्यांनी रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास आपल्या खोलीत स्वत:जवळील परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली.
                        रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मनोहरे यांना तातडीने शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मनोहरे यांना रात्री ११.५५ वाजेच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हणमंत किणीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News