शेंदुरजना घाट : वरुड तालुक्यात पावसाळ्यात बिळातुन सरपटणारे प्राणी बाहेर येत आहे. यात सर्वात जास्त प्रमाणात सापाचे आहे. ते मानवी वस्तीतील घरांमध्ये आढळण्याचे प्दिसून येत आहे. यामुळे घरात साप आढळल्यास घाबरु नका, त्यावर दुर वरुन लक्ष ठेऊन सर्पमित्रांना फोन करा, असे आवाहन सर्पमित्र, सेवानिवृत्त तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी केले आहे.
पावसाळा सुरू झाला की, पावसाचे पाणी जमिनीतील बिळात जाताच बिळातील साप कोरड्या जागेच्या शोधात नागरिकांच्या घरात प्रवेश करतात. यावेळी आवार, बाग, बुट आणि कधीकधी तर शयनकक्षात येतात. या सापांचा बचाव करण्यासाठी भारतात अनेक वन्यजीव संस्था याकरीता पुढाकार घेवून कार्य करीत आहे. यामुळे संत्रानगरी शहरासह तालुक्यात घर, दुकान, शाळा, महाविद्यालयात साप निघाल्यास घाबरु नका.
सर्पमित्रांना संपर्क साधावा. याकरीता प्रथमच नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत भुजाडे यांनी सर्पमित्रांची नियुक्ती करीत नागरिकांचे साप व सापांचे नागरिकांपासुन संरक्षण करण्याचे आवाहन करुन सेवा देण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नागरीकांनी सापाला न मारता, सर्पमित्रांना याची सूचना द्यावी, असे आवाहन संत्रा नगरीतील सर्व सर्पमित्रांनी केले आहे.
काय करु नये ? सापाला मारण्याचा अथवा जखमी करण्याचा प्रयत्न करु नये, सर्पमित्रांना याची सूचना द्या.
एकापेक्षा जास्त सर्पमित्रांना एकाच जागी साप पकडायला बोलवु नये, सापाच्या जवळ जाण्याचा अथवा मारण्याचा, जखमी करण्याचा प्रयत्न करु नये. तसे केल्यास वन्यजीव संरक्षण कायदा अधिनियम १९७२ सुधारणा कायदा २००२ अन्वये हा गुन्हा ठरतो. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा व दंड होऊ शकते. पुरेशी माहिती नसतांना साप पकडण्याचा प्रयत्न करु नये, साप घाबरेल किंवा चिडेल असे कोणतेही कृत्य करु नये, तसेच सापाकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन सर्पमित्र, सेवानिवृत्त तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी केले आहे.
श्री. संदिप माळोदे, मो. नं. 9561165380,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क (वरूड शहर व तालूका, जि. अमरावती)