August 15, 2025 8:02 am

सावनेर बसस्थानकावर 5 नविन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न

माझी माऊली फाउंडेशनतर्फे पाण्याच्या प्याऊचे उद्घाटन

सावनेर : सावनेर बस डेपोसाठी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 5 नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा दि. 02 मे 2025 ला सावनेर येथे पार पडला.  वैष्णवी ताई भगत, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे आदी मान्यवरांच्या हस्ते नवीन बसेसचे पूजन करण्यात येवून लोकार्पण सोहळा पार पडला.
                       याप्रसंगी डॉ आयुश्री आशिष देशमुख यांच्या ”माझी माऊली फाउंडेशन” तर्फे प्रवाशांकरिता पाण्याच्या प्याऊचे उद्घाटन करण्यात आले.
                        आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या शासकीय दौऱ्यांमध्ये अनेक ग्रामिण भागातील लोकांनी, विद्यार्थ्यांनी बसेसची मागणी केली होती. बसेस कमी असल्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. सदर विषयाचा पाठपुरावा आमदार देशमुख यांनी शासनदरबारी लावून महाराष्ट्र परिवहन विभागामार्फत 5 नवीन बसेस मंजूर करून घेतल्या. त्यामुळे विद्यार्थी व सामान्य लोकांना प्रवासाकरिता दिलासा मिळाला आहे.

                          सदर लोकार्पण सोहळ्यात मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, महेश चकोले, मंदार मंगळे, मंगेश कोठाडे, नितीन कमाले, दिगंबर सुरतकर, पियुष बुरडे, प्रफुल मोहटे, सोनू नवदिगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News