August 15, 2025 11:04 am

‘सावनेर – शेगाव’ व ‘सावनेर-पांढुर्णा’ बससेवा लवकरच सुरू होणार 

‘सावनेर – शेगाव’ व ‘सावनेर-पांढुर्णा’ बससेवा लवकरच सुरू होणार 

सावनेर : सावनेर येथून शेगाव आणि पांढुर्णा या मार्गांवर बससेवा सुरू करण्याच्या मागणीवर अखेर हालचाल झाली असून, एसटी विभागीय कार्यालयात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. सामाजिक कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोडे यांच्या पुढाकाराने झालेल्या या चर्चेला ठोस प्रतिसाद मिळाला आहे.
                        विभागीय नियंत्रक रंजू घोरमारे आणि अधिकारी राकेश रामटेके यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेत, ‘सावनेर – शेगाव’ बससेवा ही सावनेर आगाराला नव्या बसेस प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सुरु केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही देण्यात आली. ही सेवा विशेषतः श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दररोज शेगावला जाणाऱ्या भक्तांसाठी अत्यंत आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून ही बस बंद होती. आता ती पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

                       तसेच, ‘सावनेर – पांढुर्णा’ दरम्यान मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. या मार्गावर दररोज विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांची मोठी वर्दळ असते. सध्या खासगी वाहनचालक प्रवाशांकडून भरमसाट भाडे वसूल करण्यात येत आहे. प्रवाश्यांची प्रवासाची अडचण व त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता नागरिकांसाठी या बसफेऱ्या ही काळाची गरज आहे. या मागणीवरही सकारात्मक विचार केला जात असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
                     चर्चेला सावनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वात जामवंत वारकरी, संजय टेंभेकर, संजय राऊत, गजु चैधरी, योगेश राऊत यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. सामान्य जनतेसाठी ही बससेवा अत्यावश्यक असून, लवकरच ती जनतेच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जनतेच्या हक्काच्या प्रवासासाठी ही लढाई चालूच राहील आणि ही बससेवा सुरु होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News