♦ सीबीआयने दाखल केला क्लोजर रिपोर्ट, ♦ रिया चक्रवर्तीला मिळाली क्लीन चिट
मुंबई : सीबीआयने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट मुंबई न्यायालयात दाखल केला आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे २०२० मध्ये निधन झाले. सुमारे 4 वर्षे आणि 4 महिन्यांनंतर, सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट दिली आहे. सीबीआयच्या तपासानुसार, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही.
रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, दोघांनीही आपले नाते अधिकृत केले नव्हते. पण 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत सापडला होता. करीयर यशाच्या शिखरावर असताना त्याने स्वतःला संपवल्यामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले होते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात ड्रग्जचा अँगलही समोर आला. सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले होते. सुशांत आत्महत्या प्रकरणात तिला मुख्य आरोपी मानले जात होते. तिला एक महिना भायखळा तुरुंगात देखील जावे लागले होते.
या प्रकरणात, सीबीआयने 6 ऑगस्ट 2020 रोजी एफआयआर नोंदवला होता, आता 4 वर्षे 6 महिने आणि 15 दिवसांनंतर, सीबीआयने अंतिम क्लोजर रिपोर्ट मुंबई कोर्टात दाखल केला आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात कुठलाही पुरावा न सापडल्याने सीबीआयने तपास बंद केला आहे. सीबीआयने दोन प्रकरणांची चौकशी केली होती…
सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.
रिया चक्रवर्तींची तक्रार, ज्यामध्ये तिने सुशांतच्या कुटुंबावर मानसिक छळाचा आरोप केला होता.