80 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार शेतात जाण्यास सुविधा
मेहकर/ डोणगाव : शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेअंतर्गत तहसीलदार निलेश मडके यांनी गुरुवारी ३ एप्रिल रोजी डोणगाव – मादनी पांदण रस्ता मोकळा करून दिला. शेतरस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेअंतर्गत मेहकर तालुक्यात महसूल विभागाकडून अनेक पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. याच मोहिमेअंतर्गत डोणगाव – मादनी हा चार किलोमीटर पांदण रस्ता नेतन्सा हद्दीपर्यंत मोकळा करण्यात आला.
या वेळी मंडळ अधिकारी चनखोरे, ग्राम महसूल अधिकारी अमोल राठोड, अनुप नरोटे, भूमी अभिलेख विभागाचे राजपूत, पोलिस कर्मचारी हर्ष सहगल, महसूल सेवक संदीप परमाळे, संतोष मानवतकर, गणेश शेळके, सुभाष दोडके, सतीश मेटांगळे, बबन बोरकर, गजानन मेटांगळे, विष्णू पळसकर, शिवशंकर पळसकर, महादेव कांबळे, पांडव, बाजड, शेळके, जुनघरे व शेतकरी उपस्थित होते. हा पांदण रस्ता मोकळा झाल्यामुळे ८० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सुविधा होणार आहे. रस्ता मोकळा करताना उपस्थित शेतकरी.