करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
माझगाव कोर्टाचा धनंजय मुंडे यांना झटका मुंबई : माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसला आहे. या प्रकरणी कोर्टाच्या विस्तृत आदेशाची प्रतीक्षा आहे. …