मारहाणीला कंटाळून आईनेच मद्यपी मुलास शस्त्राने संपवले
नांदेड जिल्ह्यातील धावरी गावातील घटना; महिलेला अटक नांदेड : मद्यपी मुलाकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून जन्मदात्या मातेने आपल्या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना भोकर तालुक्यातील धावरी बुद्रुक येथे शनिवारी (५ एप्रिल) रात्री घडली. बालाजी नागा राऊत (३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. …