गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा : एक पुरुष, तीन महिला ठार
कोपर्शीच्या जंगलात आठ तास चकमक; शस्त्रसाठा जप्त गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. सुमारे आठ तास चाललेल्या या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ठार झालेल्यांमध्ये एक पुरुष व तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातही गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली. …