मोहपा पाठोपाठ कोहळीतही चोरट्यांचा हैदोस, दुचाकीसह 35,000 रुपयांचा ऐवज लंपास!
| |

मोहपा पाठोपाठ कोहळीतही चोरट्यांचा हैदोस, दुचाकीसह 35,000 रुपयांचा ऐवज लंपास!

कोहळीतही चोरट्यांचा हैदोस, दुचाकीसह 35,000 रुपयांचा ऐवज लंपास काटा वृत्तसेवा I  कळमेश्वर  (18 ऑक्टोबर) :  कळमेश्वर तालुक्यातील कोहळी गावात बुधवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच वेळी दोन दुकाने फोडून रोकड आणि दुचाकी असा एकूण ३५,००० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.        …

मोहप्यात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली
| |

मोहप्यात एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

दिपावलीच्या शुभमुहूर्तावर तीन अज्ञात चोरट्यांची धडाकेबाज कारवाई चोरट्यांनी घेतला मोहपा नगरीच्या सुरक्षेचा आढावा? काटा वृत्तसेवा : भूषण सवाईकर  मोहपा : आज मध्यरात्री तीन ते चार च्या दरम्यान घडलेल्या सणसनीखेज घटनेत संपूर्ण मोहपा नगरी शांत झोपेत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या मोहपा शहराच्या सुरक्षेचा कसून आढावा घेत सलग पांच दुकाने फोडली. घटनेत…

ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ बीडमध्ये महाएल्गार सभा

ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ बीडमध्ये महाएल्गार सभा

छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सभा, भुजबळ आणि हाके आक्रमक : जरांगेंना डिवचले बीड : ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा झाली. मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत ओबीसी आरक्षणावर गदा आणण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.                …

तामिळनाडूमध्ये दलितांविरोधात अन्याय – प्रा. सी. लक्ष्मणन यांची टीका
| |

तामिळनाडूमध्ये दलितांविरोधात अन्याय – प्रा. सी. लक्ष्मणन यांची टीका

तामिळनाडूचा दलितविरोधी चेहरा उघड मानवाधिकार पायदळी तुडवले : प्रा. सी. लक्ष्मणन यांचा आरोप नागपूर :  तामिळनाडू शैक्षणिकदृष्ट्या प्रगत वाटले तरी वास्तवात दलितविरोधी असून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका चेन्नईतील एमआयडीएसचे माजी प्राध्यापक सी. लक्ष्मणन यांनी नागपुरात रिपब्लिकन फेडरेशनच्या चर्चेत केली. त्यांनी सांगितले की, ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये तामिळनाडू देशात दुसऱ्या क्रमांकावर असून, दलितांवर सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय…

विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी : बळींची संख्या 26 झाली
|

विषारी कफ सिरपचा आणखी एक बळी : बळींची संख्या 26 झाली

साडेतीन वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू विषारी कफ सिरपचा हाहांकार नागपूर : विषारी कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मुलांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. या सिरपमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सकाळी छिंदवाडा जिल्ह्यातील चौरई परिसरातील आणखी एक साडेतीन वर्षांची निष्पाप बालिका, अंबिका विश्वकर्मा, हिचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात…