ब्रेकअपचा राग : तरुणाने एक्स-गर्लफ्रेंडवर केला चाकूने हल्ला
तरुणाची स्वतःचा गळा चिरून आत्महत्या तरुणी आयसीयूमध्ये, प्रकृती चिंताजनकलालबाग परिसरातील थरारक घटना मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या लालबाग-काळाचौकी परिसरात आज शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. ब्रेकअपनंतर मानसिक तणावात असलेल्या 24 वर्षीय तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर दिवसाढवळ्या चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. …