नाशिक कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड? साधू-संतांच्या नावाखाली पर्यावरणावर गदा
नाशिक कुंभमेळ्यासाठी वृक्षतोड? साधू-संतांच्या नावाखाली पर्यावरणावर गदा; कार्यकर्त्यांचा संताप नाशिक | आगामी सिंहस्थ कुंभमेळा निमित्त नाशिकमध्ये शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येताच पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक समुदायाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. साधू-संतांच्या तात्पुरत्या निवासासाठी जंगलातील वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. “साधूंसाठी झाडांची कत्तल? संत परंपरेचा अपमान”…