हकालपट्टी होताच कराळे गुरुजी भावूक; अश्रू अनावर, शरद पवारांबद्दलचा आदर कायम!
पक्षासाठी राज्यभर फिरलो, स्वतःच्या क्लासकडे दुर्लक्ष केले; कारवाईवर प्रश्न उपस्थित करत निवडणुकीनंतर भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत नागपूर | प्रतिनिधी : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी नितेश कराळे गुरुजी यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली….