August 15, 2025 1:30 pm

मशिदीतून घरी जाताना दोघांनी केला चाकूने वार

ईदच्या रात्री नमाजीवर जीवघेणा हल्ला, आरोपी अटकेत

पुणे : रमजान ईदच्या दिवशी रात्री नमाज पठाण करून घरी निघालेल्या एकाला रस्त्यात आडवून चाकुने पोटात भोकसून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सलिम शेख आणि अमिर शेख (दोघेही रा. मार्कडेयनगर, वैदवाडी हडपसर ) या आरोपीच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आवेज फिरोज शेख (23, रा. मार्कडेयनगर, वैद्यावाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
                        पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी वैदवाडी येथील अंजुमन तालीमुन मशीद येथून नमाज पठण करून वैद्यवाडी येथील भिम साम्राज्य प्रतिष्ठान येथून चालले होते. त्या ठिकाणी फिर्यादी यांना गर्दी झालेली दिसली. गर्दीतून फिर्यादीने वाट काढून पाहिले असता तक्रारदार यांचे मामा सलजीम अमिन सय्यद यांना त्यांच्याच वस्तीत राहणारा सलीम शेख व त्याचा मोठा भाऊ अमिर शेख हे दोघेजण मारहाण करत होते. त्याचवेळी सलिम शेख याच्या हातात सुर्‍या सारखे धारदार हत्यार होते. त्यावेळी अमिर शेख याने सलीम सय्यद यांची कॉलर पकडून सलीम शेख यास म्हणाला की, डाल दे इसके पेट में. त्यानंतर सलीम शेख याने त्याच्या हातातील चाकू फिर्यादीचे मामा सलीम सय्यद यांच्या पोटात खुपसला.
                         यावेळी त्यांच्या पोटातून रक्तस्त्राव होऊ लागला. तसेच सलीम सय्यद ओरडत जमीनीवर खाली कोसळले. यावेळी फिर्यादी हे मध्ये पडले त्यांनी सय्यद यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले. त्यावेळी अमिर शेख हा तेथून पळून गेला. मात्र सलीम याला फिर्यादी यांनी पकडून ठेवले. त्यानंतर रिक्षातून सलीम सय्यद यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. चाकुने सय्यद यांच्या पोटात भोसकल्याने त्यांना पोटावर आणि पाठीवर जखम झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News