मालेवाडा : श्री हनुमान मंदिर देवस्थान मालेवाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरीनाथ महाराज पिंपळे यांच्या हस्ते सप्ताहाची सुरुवात होईल.
भजन हरिपाठ नाम कीर्तन आदी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत सप्ताह दरम्यान माधवराव महाराज चावके रोशन महाराज पांगुळ नामदेव महाराज बाळबुधे, सुनील महाराज येरखेडे, ज्ञानेश्वर महाराज महाले, पंकज महाराज पवार अमोल महाराज बडाख हरिओम महाराज निंबाळकर यांचे कीर्तन होतील.