August 15, 2025 1:31 pm

बाबा जुमदेवजी च्या शोभायात्रेने दुमदुमली मोहपा नगरी

मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची जयंती उत्साहात साजरी

भूषण सवाईकर
मोहपा : मानवधर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त मोहपा शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मोहपा शहरासह कळमेश्वर, डोरली भिंगारे, वाढोणा, सवंद्री, कोहळी, खुमारी, पिल्कापार म्हसेपठार या गावातील अनेक सेवकांच्या वतीने ढोलताशा पथक, डीजे आणि फटाक्याच्या आतिषबाजीने शोभायात्रा काढण्यात आली.
मोहपा येथे कार्यक्रमाची सुरुवात जीवन गवळी यांच्या घराजवळून कळमेश्वर शाखेचे मार्गदर्शक हंसराज साकोरे यांच्या हस्ते भगवान बाबा हनुमानजीच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच कळमेश्वर शाखेचे मार्गदर्शक सूर्यभान टेकाडे यांच्या हस्ते बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे पूजन समृद्धी कामडी यांच्या हस्ते करण्यात आले.
                         शोभायात्रेचे उद्घाटन मोहपा शाखेचे मार्गदर्शक प्रमोद रेवतकर, हंसराज साकोरे, सूर्यभान टेकाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शोभा यात्रेत मोहपा परिसरातील मार्गदर्शक प्रमोद रेवतकर, प्रदीप काबडी, जीवन गवळी, रोशन कामडी, गुरुदेव काथवटे, अरविंद पलाडे, चंद्रशेखर कावडकर, विलाज कावडकर, रवींद्र लोखंडे, दिलीप लोणकर, किशोर इंदुरकर, माणिक अंबागडे, योगेश बांगडकर, अमन रेवतकर, अभय रेवतकर, गिरीधर उघडे, योगेश टेकाडे, आशिष येसकर, राजीव टापरे व वाढोणा परिसरातील सेवक यांच्यासह अनेक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
                          या शोभायात्रेमुळे संपूर्ण मोहपा शहरात भक्तीभाव व नव चैतन्याचे वातावरण तयार झाले होते. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सेवकांनी एकत्र येऊन ही प्रेरणादायी परंपरा जपली आहे. या शोभायात्रेचे आयोजक मोहपा येथील मार्गदर्शक प्रमोद रेवतकर, प्रदीप कामडी, गुरुदेव काथवटे, रोशन कामडी ,किशोर रेवतकर , जीवन गवळी ,अरविंद पलाडे, रवींद्र लोखंडे या सेवकांनी कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News