मानवतावादी विचाराचा प्रबोधनात्मक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन
सावनेर : जनमानसात महापुरुषांचे विचार रूजावे या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यंदाही जनकल्याण सामाजिक बहु. संघटनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम शुक्रवार (११ एप्रिल ) ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक जवळ, सावनेर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम, सत्कार समारंभ, मानवतावादी विचाराचा महासंग्राम, राष्ट्रीय दुय्यम गंमतीचा जंगी सामना, प्रबोधनकार वैभव सांस्कृतिक कला मंडळ शाहीर निनाद बागडे व राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांचा महापुरूषाच्या विचारधारेवर खडा जंगी दुय्यम तमाशा आदि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे ऊद्धाटन बहुजन मुक्ती आंदोलन, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अभिविलास नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. विजय धोटे, उत्तम बलवीर विस्तार अधिकारी प. स. सावनेर, मयुर नागदवने, अध्यक्ष भारतीय परिवर्तनवादी संघ, उमेश गणोरकर, बाबाराव दुपारे, निशा खडसे, शामराव डांबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवर वक्ते व शाहिरांनी आपल्या कलाकौशल्यातुन महापुरुषांच्या विचारआधारावर प्रबोधन केले. तसेच विविध क्षेञात ऊत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विजय धोटे, ऊत्तम बलवीर, शामराव डांबरे, शांताराम ढोके, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सातपुते, ढोके, युवराज मेश्राम, किशोर गणविर, अनेश रोकडे सरपंच ग्राम पं. बिचवा आदिंचा शाल पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना, आज देशाला संत महापुरुषांच्या विचारांची गरज असुन ते आत्मसाद करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक अभिविलास नखाते यांनी महात्मा फुले यांच्यासह महापुरुषांच्या विचारावर प्रकाश टाकत ओबीसी, एस सी, एन टी समाजबांधवांनी महापुरुषांच्या पुस्तकाचे वाचन करून खरा इतिहास समजुन घेण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी तालुक्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था महा. राज्य संस्थापक अध्यक्ष भगवान चांदेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र सातपुते यांनी संचालन व उपस्थितांचे आभार मानले.