August 15, 2025 1:31 pm

 “प्रफुल कुचेवार यांना ग्रामगीता गौरव पुरस्कार प्रदान!”

आद्यग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठानचा उपक्रम

का टा वृत्तसेवा
वर्धा : नवतरुण हाच गावाचा कायापालट करू शकतो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचार गावात जनसामान्यापर्यंत पोहोचून राष्ट्रसंत युवक विचार मंच स्थापना करून. गावात विकासात्मक कार्याला प्राधान्य देऊन नवतरुण गावाचा विकास करू शकतो. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बेलूरकर यांनी व्यक्त केले.
                        दिनांक १ ते 30 एप्रिल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस वर्धा जिल्ह्यातील विविध गावात आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान, नागपूर तर्फे ग्रामजयंती सोहळा विविध गावात संपन्न झाला.  दिनांक 28 तारखेला धामणगाव वाठोडा येथे ज्येष्ठ गुरुदेव भक्त बाळकृष्ण जी हांडे, वसंतराव कुचेवार, विजय राऊत, सुरेश नागपुरे, सेवाग्राम चे सामाजिक कार्यकर्ते संदीप सुटे, जय प्रकाश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धामणगाव वाठोडा येथे, ग्राम जयंती सोहळा संपन्न झाला,
                        यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल कुचेवार यांना ”ग्रामविकास सेवाभाव पुरस्कार” प्रदान करण्यात आला, गावात वंदनीय राष्ट्रसंत युवक विचार मंच स्थापना करून, गावात ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, गावाच्या मालकीचा दवाखाना, विविध सामाजिक उपक्रम राबवून, प्रफुल कुचेवार, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे नेत आहेत, आद्य ग्रामगीताचार्य प्रतिष्ठान तर्फे गावात सामाजिक कार्यात सहभाग घेणाऱ्या विविध लोकांचा सत्कार करण्यात आला,  वसंतराव कुचेवार, दिवाकर होनाडे, सरपंच रेशमाताई प्रफुल कुचेवार, आशाताई, रंजनाताई वाणी, अंगणवाडी सेविका प्रगती मेंढे, सुनिताताई महेशकर, शांताबाई मोहिते, मुक्ताबाई राऊत, पोलीस पाटील कमलाकर नेहारे, प्रियाताई नागोसे, यावेळी बाळकृष्ण हांडे यांनी नवीन पिढीने गावात नेमाने सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्याचे आव्हान केले, वसंतराव कुचेकर यांनी गावात लावलेला सेवा मंडळाचा वृक्ष दिवाकर होणाडे यांनी समोर न्यावा असे मत व्यक्त केले,
                         यावेळी प्रफुल कुचेवार यांनी, गावाच्या विकास कार्यात गावातील सर्व लोकांच्या सहभागामुळे, चांगले कार्य होत आहेत, यामध्ये सर्व समाज बांधवांचा सहभाग मिळत आहे, युवकांच्या सहभागामुळे हे सर्व होत आहे.  शासकीय स्तरावरून गावाच्या विकास कार्यात पुढे मदत मिळाल्यास अजून काही कामे करता येईल, असे मत व्यक्त केले, ज्येष्ठ लोकांचे कार्य आम्ही पाहिलेले आहेत, तोच वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे. असे मत व्यक्त केले,
                         कार्यक्रमाचे संचालन बाळकृष्ण हांडे यांनी, तर आभार प्रदर्शन सुरेंद्र बेलूरकर यांनी केले, राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंचासह सभासदांनी, गावातील महिला बचत गटांनी, ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.. कार्यक्रमाला गावातील लोकांची उपस्थिती लक्षणीय होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News