August 15, 2025 1:11 pm

भारतीय सैन्य दलाचे वीर जवान रत्नाकर गोविंदराव अखंड अनंतात विलीन

पहलगाम हत्याकांडाचा बदल्यात दोन दिवसात सरकार काहीतरी भयंकर कारवाई करणार : डाॅ. राजीव पोद्दार

का टा वृत्तसेवा

कळमेश्वर: कळमेश्वर- ब्राह्मणी येथील रहिवासी, भारतीय सैन्य दलातील वीर जवान रत्नाकर गोविंदराव अखंड (40 वर्षे) यांचे आसाम येथे कर्तव्यावर असताना दिनांक 30 एप्रिल ला अकस्मात दुःखद निधन झाले. ते 40 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.  आज सकाळी 11 वाजता त्यांचेवर कळमेश्वर येथील मोक्षधामावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

                    यावेळी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय, भारतीय सैन्य दल (कामठी कंटोन्मेंट बोर्ड), कळमेश्वर पोलीस स्टेशनचे निरिक्षक काळबांडे, तसेच सैन्य दलातील माजी सैनिक संघटनेकडून पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.  स्थानिक नागरिकांमध्ये डाॅ. राजीव पोद्दार, महादेव इखार, धनराज देवके, दिलीप धोटे, मधुकर दळवी इ., कळमेश्वर व परिसरातील तरुण व महिला पुरूष नागरिकांनी वीर जवान रत्नाकर अखंड यांना मानवंदना देवून, ‘‘विर जवान रत्नाकर, अमर रहे..’’ च्या घोषणा देत अखेरचा निरोप दिला.
                     यावेळी कळमेश्वरातील तरुण व महिला पुरूष नागरिक स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. रत्नाकर अखंड येत्या सहा महिन्यांमध्ये सेवानिवृत्त होणार होते. स्व. रत्नाकर यांचे वडिलांनीही सैन्य दलामध्ये सेवा बजावली होती.
                   ∗ “ यावेळी श्रद्धांजलीपर बोलताना डाॅ. पोद्दार यांनी पहलगाम येथे झालेल्या 28 निरपराध नागरिक-पर्यटकांच्या हत्याकांडाचा उल्लेख करून बदल्यात दोन दिवसात सरकार काहीतरी भयंकर कारवाई करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले, हे विशेष. या दुःखद प्रसंगी डाॅ. पोद्यार यांनी केलेल्या विधानाने संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News