कौतुकाची थाप मारायला वडील नसल्याची व्यक्त केली खंत
बीड : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते. त्यात पेटलेले राजकारण आणि वाल्मीक कराड सारखा आरोपी समोर येणे, या सगळ्या घडामोडी घडत असताना संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचे बारावीचे महत्त्वाचे वर्ष सुरू होते. अशा परिस्थितीत कष्टाने अभ्यास करत तिने चांगले यश मिळवले आहे.
संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखला बारावीच्या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितात 94, फिजिक्समध्ये 83, केमिस्ट्रिमध्ये 91 आणि बयोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. एकूण 600 पैकी 512 गुण मिळवत वैभवीने घवघवीत यश मिळवले आहे.
