August 15, 2025 7:28 am

सावनेर व कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

* महसूलमंत्री ना- चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार
* आ. डॉ आशिष देशमुख यांनी शिबिरांसाठी घेतला पुढाकार

का टा वृत्तसेवा : इरशाद दिवान
सावनेर/ कळमेश्वर : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात येत आहे. शासन तुमच्या दारीच्या माध्यमातून हे अभियान जनतेच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करणार आहे.
                        ११ मे २०२५ ला सकाळी ११.०० वाजता आमदार डॉ. आशिष देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय, पामकोर्ट लॉन, नागपूर रोड, सावनेर येथे आणि १३ मे २०२५ ला सकाळी ११.०० वाजता तहसील कार्यालय, कळमेश्वर येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनायक महामुनी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून जनतेच्या शासकीय तक्रारी, अडचणी व योजनांबाबत माहिती येथे मिळणार आहे. या शिबिरांदरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, तसेच थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपले प्रश्न मांडता येतील.
                       प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन, लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, विविध प्रमाणपत्राचे वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, विविध योजनासंबंधी मार्गदर्शन असे या शिबिरांचे स्वरूप असणार आहे.
                      “सर्वसामान्य जनतेचा व शेतमजूरांचा दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाशी नियमीत संबंध येतो. महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी या समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या समाधान शिबिरांमध्ये सावनेर-कळमेश्वर तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा”, असे आवाहन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News