‘लोटस फिटनेस जिम’ मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा
कळमेश्वर : आज 21 जून 2025 हा अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून भारतासह जगातील 160 चे वर विदेशातून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तद्वतच् कळमेश्वर येथील ‘लोटस फिटनेस जिम’ मध्ये यंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुरुष तथा महिला असे दोन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. शहरातील तरुण मंडळींनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.
