कळमेश्वरातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

कळमेश्वरातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

२६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव 

कळमेश्वर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोमवारी (दि. ७) नव्याने जाहीर करण्यात आले. यात २६ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे. यासाठी कळमेश्वर तहसील कार्यालयाच्या सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. हे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी लागू राहणार असल्याची माहिती तहसीलदार विकास बिक्कड यांनी दिली.

                       सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला १२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद गेले असून, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ७, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी ४ आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी ३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले आहे. ही सोडत राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या निर्देशानुसार व लहान मुलीच्या हाताने काढण्यात आली. तहसीलदार विकास बिक्कड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या विशेष सभेला नायब तहसीलदार (निवडणूक) आभा वाघमारे, मंडळ अधिकारी शरद बोरकर, लिपिक (निवडणूक) बिलाल खान यांच्यासह संबंधित गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक व राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण

नागरिकांचा मागास (ओबीसी) प्रवर्गातील महिलांसाठी निमजी, भडांगी, तिडंगी, लोणारा, सावळी (बु.), मढासावंगी व मांडवी येथील सरपंचपद राखीव करण्यात आले असून, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आदासा, निळगाव, वरोडा, घोराड, पानउबाळी व लोहगड येथील सरपंचपद आरक्षित केले आहे.

अनुसूचित जाती व जमाती आरक्षण

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी पिल्कापार, वाढोणा (बु.), पारडी (देशमुख) व परसोडी येथील सरपंचपद राखीव करण्यात आले असून, अनुसूचित जाती खुला प्रवर्गासाठी सावंगी (तोमर), सोनोली, सावळी (खुर्द) व तोंडाखैरी येथील सरपंचपद आरक्षित केले आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी झुनकी, कळंबी व पिपळा (किनखेडे) येथील सरपंचपद राखीव केले असून, अनुसूचित जमाती खुला प्रवर्गासाठी बोरगाव (बु.) व खुमारी येथील सरपंचपद आरक्षित केले आहे.

सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण

सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी तेलगाव, बोरगाव (खुर्द), उबाळी, नांदिखेडा, कोहळी, खापरी (कोठे), कन्याडोल, मोहगाव, लिंगा, आष्टीकला, म्हसेपठार व गोंडखैरी येथील सरपंचपद आरक्षित करण्यात आले असून, सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपरवाही, तेलकामठी, धापेवाडा (बु.), खैरी (लखमा), साहुली, सुसुंद्री, सेलू, सोनेगाव, बुधला, दहेगाव, तिष्टी (बु.) व चाकडोह येथील सरपंचपद राखीव केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News