August 15, 2025 4:30 am

‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

‘एक पेड माँ के नाम’ अभियानांतर्गत वृक्षारोपण

मातृसन्मान व हरितक्रांतीसाठी प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करावा : सरपंच संगीता वासनिक

का टा वृत्तसेवा I भुषण सवाईकर
कळमेश्वर : ‘एक पेड़ माँ के नाम’ हे एक पर्यावरण आणि सामाजिक जाणीव वाढवणारे अभियान असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या सन्मानार्थ, आईच्या वाढदिवशी, आईच्या स्मृतीमध्ये व नवजात बाळासाठी आईच्या नावाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करून मातृसन्मान व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन वरोडा ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता वासनिक यांनी केले आहे. त्या ग्राम पंचायत वरोडा येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या.
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com                         जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारला वरोडा येथे ‘एक पेड माँ के नाम’ या अभियाना अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय, आयुष्यमान आरोग्य मंदिर, जिल्हा परिषद शाळा, ताराबाई मोडक अंगणवाडी, तसेच घरकुल लाभार्थ्यांच्या प्रांगणात मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करून मातृसन्मान, हरितक्रांती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ही योजना तालुक्यात सर्वत्र राबविण्यात आल्याचे कळते. परंतू शासकिय स्तरावर ‘एक पेड माँ के नाम’ साठी वरोडा ग्राम पंचायतची निवड केल्याबद्धल  सरपंच संगीता वासनिक यांनी संबंधितांचे आभार मानले आहे.
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com
                          सावनेर उपविभागिय अधिकारी संपत खलाटे, कळमेश्वर तहसीलदार विकास बिक्कड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. राजकुमार गेहलोत, पं. स. गटविकास अधिकारी अंशूजा गराटे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. बुराडे, सरपंच संगीता वासनीक, उपसरपंच हिरालाल डाखोळे, ग्रा. पं. सदस्य मिलिंद राऊत, घनश्याम टेकाडे, आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा कुलकर्णी, कृषी अधिकारी मात्रे इ. च्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com
कामगार टाइम्स छायाचित्रसेवा www.kamgartimes.com
                         वाढत्या प्रदूषणावर उपाय आणि हरित भारताची निर्मिती, लोकांमध्ये वृक्षलागवडीसंबंधी भावना आणि जबाबदारी निर्माण करणे. या संकल्पनेवर आधारीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या आईच्या प्रेम आणि त्यागासाठी, तिच्या नावाने एक झाड लावावे, त्याचे संगोपन करावे आणि वाढवावे हा संदेश घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन कळमेश्वरचे नवनियुक्त तहसिलदार विकास बिक्कड व सर्व शासकिय अधिकाऱ्यांनी केले.
                         या कार्यक्रमाला डाॅ. राजश्री राऊत, ढगे, सोनुले, माहुरे, कुंभारे, कुकडे, काटकर, अंगणवाडी सेविका साधना राऊत, रविता वासनिक, जि. प. शिक्षिका पुष्पलता नारनवरे व मोठया संख्येने गावकरी उपस्थीत होते.  कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी ग्रा. पं. कर्मचारी गोविंदा राऊत, पिंटू निकोसे, रामचंद्र भोयर, सुरज डाखोळे, ज्ञानेश्वर डाखोडे, यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News